कविता…

Jalate_Tutate.png

कविता गेल्याची बातमी ऐकल्यापासून काही सुचेना! अनेक ठिकाणी बातमी दिसत होती, आणि मला अधिकच अस्वस्थ करत होती. अनेक मित्र-मैत्रिणींनी, “तुला कळले का?” अशी चौकशी ही केली.. पण मला काही सुचेना!

अखेर, कुहू कादंबरीतील गाणी पहात बसलो…आणि सगळ्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या! कॉलेज सोडल्यानंतर जवळपास २० वर्षांनी माझी आणि कविताची केवळ योगायोगाने भेट झाली! नांदेडला व्याख्यानासाठी गेलो असताना, तिच्या ई फोन केला..आणि तिचा वसईमधील पत्ता आणि संपर्क मिळवला! तिला फोन केल्यावर ती आश्चर्यचकित झाली!

नंतर पवईच्या घरी तिचे येणे झाले…आणि त्या भेटीत तिने कुहू चा विषय मांडला. कौमुदीला तर तिने मैत्रीणच बनवले! आणि मग सुरु झाला एक सुंदर प्रवास! पुढची जवळपास दोन वर्ष कुहूमय होती! एक समृद्ध करणारा अनुभव होता. त्यामधील तिच्या कविता अप्रतिम होत्या, उदाहरणार्थ:

रे निळया आकाशी स्वरा,
थांब ना,
बोल ना जरा…
हे रितेपणाचे काहूर
अंतरी तोल ना जरा

किंवा

मनात काही मावत नाही
येते उसळुनी वरती
मनात मावेना आभाळ
मावत नाही धरती

त्यातलीच एक कविता, ज्यासाठी मी स्पेशल इफेक्ट वापरून केलेला हा व्हिडियो माझा आवडता आहे: मन वादळ बनले . अर्थात अनेक कलाकारांच्या सहभागातून हे तयार झाले आहे. कवियत्री: कविता महाजन, संगीत: आरती अंकलीकर, स्वर: हृषीकेश बडवे, सुलेखन: दत्तराज दुसाने, दृश्य प्रभाव सहाय्य: प्रकाश जडीयार.

One thought on “कविता…

Add yours

  1. I never met her, but the outpouring of grief from some close friends is definitely an indication that she was a lively person and a generous soul. May her soul rest in peace.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: