Media | Music | Medicine

mmm.pngThink of three of us, and I realise that we have always been so different, yet we have so much in common! Thanks to our parents who gave us the wings to be our self! It was indeed a bold step when we had society around who was running after some set norms! Our parents not only had faith in whatever we were doing, but also had appreciation, and encouragement to excel in that particular domain! This has resulted in the unique but diverse career paths that we could choose for ourselves!

As the ‘eldest’ I am proud for my siblings! Dr. Shrikant who has excelled in the niche domain of ‘critical care’, not only as a successful Intensivist, but also as a sought after faculty member in the academic conferences and symposiums! Neelima showed her determination to head back to Music, and secured first place when she completed her post graduate degree in Music, that to after a long gap of ~10 years. Her tryst with Music has now blossomed in a new avatar, where she manages and teaches at a Music Academy!

Remembering both of you today, as we celebrate the ‘Bhaubeej’! Wishing you a happy, prosperous and healthy life ahead!

Advertisements

एका गुरुचे निर्वाण

PaurnimaTai
रविवारी रात्री आम्ही इंदूरहून घरी परतलो, आणि सोमवारचे वेध लागले! सकाळी जाग आल्यावर कळलं की कौमुदी आधीच उठून दुध आणायला गेलीय, आणि बहुतेक व्यायामालाही! म्हणून चहा केला, आणि तिची आणि ती आणणार असलेल्या पेपरची वाट पहात बसलो! यथावकाश पेपर, आणि चहा असा सरंजाम जमला, आणि आम्ही त्याचा आस्वाद घेऊ लागलो.

तेवढ्यात फोन ची रिंग वाजली. कौस्तुभ (कौमुदीचा भाऊ), चा भाऊ बोलत होतं, असं कळलं, आणि मी पेपर वाचनात गुंग झालो. सहज पाहिलं तर कौमुदी काहीच बोलत नव्हती. खूप वेळानं तिने, “हं”. असं म्हणून फोन ठेवला, आणि रडवेल्या सुरात म्हणाली, “पौर्णिमा ताई गेली “. 

अत्यंत धक्कादायक बातमीतून सावरायला आम्हांला खूप वेळ लागला. बराच वेळ आम्ही काही न बोलता नुसते शून्यात बघत होतो! मनात पौर्णिमाताईच्या आठवणींचा कल्लोळ माजला होता. 

पौर्णिमाताई ही एक हाडाची शिक्षिका. संस्कृत हा विषय ती शिकवायची! आई-बाबांकडून मिळालेला विद्यादानाचा वारसा तिने पूर्ण तन्मयतेने जोपासला होता. काही वर्षांपूर्वी तिचे यजमान (सुधीर उपगडे), ह्याचं अकस्मात निधन झाल्यावर, तिने मोठ्या हिमतीनं संसार आपल्या खांद्यावर पेलला होता. ह्यात तिला संपूर्ण उपगडे कुटुंबाची भक्कम साथ होती! ‘निशा’ हर्बल ही भारतात आयुर्वेदिक औषध निर्मिती करता प्रसिद्ध अशी कंपनी, उपगडे ह्या कुटुंबियांची. ह्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने तिला तिच्या शाळेतील नोकरीबाबत सतत प्रोत्साहनच दिले! तिच्या तीनही मुलांच्या शिक्षणावर तिने तिचे सर्वस्व पणाला लावले होते!

केवळ ४८व्य वर्षी तिचं अचानक जाणं धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. ह्या जगाला उत्तम ‘माणसांची’ नितांत गरज आहे. उत्तम शिक्षकांची तर त्याहूनही आहे. उन्मादाचे ओंगळवाणे आणि किळसवाणे प्रदर्शन जेव्हा आपल्या सभोवताली फेर धरून  घोंगावते, त्यावेळी पौर्णिमाताई सारख्या मितभाषी, सहृदय, आणि सुसंस्कृत शिक्षिकेचं असं अचानक जाणं मन विषण्ण करतं. ह्या लेखाची सुरुवात करून बरेच दिवस झाले आहेत,  परंतु कुठल्याच शब्दांनी मला माझ्या मनात असलेलं काहूर व्यक्त करता येत नव्हतं. अखेर काही प्रमाणात आशय गवसला असं वाटल्यावर लेख पूर्ण केला.

तिच्या आत्म्याला सद्गती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 

|| हरी ॐ ||