Selected as 2019 edX Prize Finalist!

edX_PrizeExtremely delighted to share the news that the Fundamentals of 3D visualization program from IITBombayX has been selected as one of the 10 finalists for the edX Prize 2019! It is a result of the visionary leadership of Prof. DB Phatak, Prof. Sridhar Iyer, Prof. Sudarshan; and the support from the entire team at IITBombayX led by Dr. Kalpana Kannan. It was her team member: Urmila Deshmukh, who was the first one to suggest that I file my nomination! Thank you Urmila for that!

This program could not have been possible without the support from my co-instructors: Kaumudi Sahasrabudhe, Nitin Ayer, and Sneha Deorukhkar. The production and the post-production teams (Shekhar Ovhal), teaching assistants, and the discussion forum moderators have been crucial in creating this. My colleagues Heramb Sukhthankar, Nitin Ayer, Amit Shukla, Sandeep Gaikwad, and Md. Salman worked painstakingly, through the data of the 54000 learners to create an impressive nomination! Your hardwork has paid off boys!

This program, has more than 25000 learners registered (over the 4 offerings so far). Interestingly, the completion rate of these skill courses has been over 65%.

I have had the fortune of interacting with most vibrant participants who have made this journey memorable! Being in top 10 teachers itself is a great feeling! and I will be forever indebted to all those who have made this possible! We keep our fingers crossed and await the final result! Keep those wishes pouring in!

Advertisements

गुरुपुराण ।३। अजेय झणकर

अजेय सर आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांचं अस्तित्व मला अनेक वेळा जाणवत राहतं आणि म्हणून मी त्यांचा उल्लेख ते माझ्या बरोबर असल्या सारखाच करणार आहे.

AjeySirऔरंगाबादहून पुण्याला नोकरीच्या निमित्ताने आलो, आणि २-३ ठिकाणी प्रयत्न केला. सर्वात आधी सदाशिव पेठेत एका प्रकाशन संस्थेत मासिका साठी चित्रं काढू लागलो. पण तिथे खूपच कमी काम असल्यामुळे काही महिन्यात कंटाळलो . नंतर मी खडकी येथील एका जाहिरात संस्थेमध्ये काम करू लागलो. तिथे रूढार्थाने जाहिराती होत नसत. बरेचसे काम औद्योगिक प्रकारचे असे. विविध यंत्रांसाठी लागणारे स्टिकर्स, पत्रकं, आणि माहितीपुस्तिका बनवण्याचं काम असे.

मला सांगितल्याप्रमाणे मी मार्केट मिशनरीजच्या ऑफिस मध्ये वेळेवर जाऊन पोहोचलो अजेय सर थोडयाच वेळात भेटतील असं सांगून तिथले कर्मचारी लगबगीने आत बाहेर करत होते. बराच वेळ वाट पाहिल्यावर अखेर अजेय सर तिथे आले. मला पाहून एकदम त्याना साक्षात्कार झाला आणि ते म्हणाले,”अरे, तूच का तो आर्टिस्ट ज्याचा मी Interview घ्यायचाय? बरं झालं तू इथे बसला होतास नाहीतर मी पूर्णपणे विसरून घरी निघून गेलो असतो. माझं काम बघितल्यवर त्यानी फारशी प्रतिक्रिया दिली नाही. परंतु तुला कधी यायला जमेल हे मात्र विचारलं. मग  मला किती पगार मिळतो हे पण विचारलं. त्याकाळी मला तेराशे रुपये असा भरभक्कम पगार मिळत असे. ते ऐकून अजेय सर थोडे विचारात पडल्यासारखे वाटले. त्यावर मी त्यांना म्हटले,”सर मला जास्त पगाराची अपेक्षा नाही. मला काम करायचं आणि शिकायचं आहे.

थोडा वेळ विचार करून अजेय सर मला म्हणाले, ”मोठी पंचाईत आहे मी ठरवलं तरीही मला तुला अडीज हजार पेक्षा एक रुपया कमी पगारावरही ठेवता येणार नाही. अरे, आमच्या कंपनीचा नियमच आहे हा.” मी हुशः केलं आणि, या भरगोस पगारवाढीचा आनंद घेऊन मार्केट मिशनरीज मध्ये रुजू झालो.

अजेय सरांबरोबर काम करणं हा एक विलक्षण अनुभवच होता. या काळात आम्ही घडयाळ न वापरता केवळ कॅलेंडरच वापरावं अशी परिस्थिती होती. दिवस-रात्रयाचं भान आमच्या या टीमला कधीही नसे. आणि या सर्व काळात अजेयसर आमच्या बरोबर कायमच असत. हळूहळू याची सवयच झाली. संध्याकाळी कल्पनेवर काम सुरु करणे मग त्यावर अनेक चर्चा आणि अखेर जेवणानंतर त्यावर शिक्कामोर्तब मग रात्री तापकीर, अतुल (बाबा) किंवा बाब्या आमच्यासाठी कुठे जेवण मिळतंय कां याची चौकशी करणार. अजेयसर आणि आम्ही मुलं म्हणजे मीराजप्रकाश, आणि कधी कधी मामा (म्हणजे सुनील हंबीर) हे सगळे तिथे जाऊन पाव भाजी किंवा डेक्कनला  पिठलं भाकरी खाणार. ह्या सगळ्यात अजेय सर कधीही त्याचं ‘सर’पण आमच्यावर लादत नसत. हास्य-विनोद करत हे जेवण चालायचं. बहुतेक वेळा अतुल हा एक हक्काचं गिऱ्हाईक असायचा! अजेयसरांचं प्रेमही विलक्षण असायचं. मला आठवतंय, विजय सरांना तिखट आवडतं म्हणून त्यांच्या वाढदिवसाला ‘ठेचा पार्टी’ केली होती!

मला माझ्या पुढच्या शिक्षणासाठी हैदराबादला जावं लागणार होतं. तो निर्णय त्यांना सांगितल्यावर त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, आणि मला भरभरून आशीर्वाद दिले! त्यानंतरही आम्ही संपर्कात होतो, आणि काही वर्षांनी जेव्हा मी मुंबईत स्थायिक झाल्याचं त्यांना कळलं तेव्हा त्यांनी मला भेटायला बोलावलं. ‘लेकरू’ च्या प्रीमियर ला आवर्जून सपत्नीक येण्याबद्दल आमंत्रण दिलं! कौमुदी पण मार्केट मिशनरी ची एक मिशनरी आहे हे कळल्यावर त्यांना खूप आनंद झाला! 

परंतु, त्यांची सर्वात आवडती आठवण म्हणजे, त्यांच्या बरोबर केलेले प्रवास. त्यातल्यात्यात आम्ही एकत्र केलेला पुणे ते नांदेड हा प्रवास खरोखरच अविस्मरणीय होता! नांदेड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संभेलनात ‘सरकारनामा’ प्रकाशित होणार होती, आणि त्यासाठी आम्ही तिथे जायचं ठरवलं! खरं म्हणजे मी औरंगाबादचा, म्हणून मला बरोबर घेतलं होतं, परंतु मी औरंगाबाद च्या पुढे मराठवाडा पहिलाच नव्हता! माझं बिंग लवकरच उघडकीस आलं, कारण मला त्या रस्त्यातील गांवं कुठली, हे माझ्या गावीही नव्हतं! औरंगाबाद जवळ आलं होतं आणि जेवायची वेळ झाली होती. मी विचारलं, “सर, आपण घरीच जाऊ जेवायला”. त्यावर ते म्हणाले, “अरे, अचानक गेलो तर तुझ्या आई, आजीला त्रास होईल.. त्या पेक्षा आपण इथे धाब्यावर खाऊन घेऊ, आणि मग चहा प्यायला तुझ्या घरी जाऊ! तापकीर, बघ एखादा धाबा आहे का, आणि गाडी थांबव!”. आम्ही तिथे जेऊन मग घरी गेलो. अजेय सर माझ्या घरी सगळ्यांना भेटले. त्यांना ‘साहेब’ म्हणवून घेताना खूपच अवघडल्यागत झालेलं पाहिलं! माझ्या बाबांना ‘सरकारनामा’ची प्रत देऊन, आम्ही नांदेड ला गेलो. साहित्य संभेलनात मला ते वारकऱ्या सारखे दिसले! इथल्या सारस्वतांच्या मांदियाळीत ते presentations, campaigns, budgets, आणि deadlines ला काहीही स्थान नव्हतं!

एरव्ही ‘धर्म-प्रसारक’ ह्या जमातीद्वारे केल्या जाणाऱ्या धार्मिक रूपांतरणाविषयी माझ्या मनात खूप अढी आहे, परंतु, अजेय झणकर ह्या अवलिया ‘मिशनरी’ने मात्र तुम्ही करत असलेल्या कामातून ‘आनंद’ कसा घ्यायचा ह्याची ‘दीक्षा’ आणि ‘संथा’ मला आणि त्याच्या बरोबरच्या प्रत्येकाला अगदी सप्रयोग दिली! अनेक वर्ष (१७ पूर्ण झाली ह्या महिन्यात) सरकारी नोकरीत राहूनहि मला काम करताना द र रो ज ‘मज्जा’ येते, किंवा मी अजून ‘सरकारी बाबू’ का नाही झालो ह्याचं रहस्य अजेय सरांबरोबर ‘जगलेल्या’ काळात दडलेलं आहे!