MOOC karoti vachalam

मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥

By whose grace dumbs start talking, lame men climb mountains,
I worship that Sri Krishna, the supreme bliss.
(Courtesy: Sanskrit Subhashitmala)

I have used the first stanza of this verse and slightly tweaked it to narrate the examples where I have found the Massive Open Online Courses (MOOCs) to be an enabler in the current online education scenario.

MOOC_Karoti_Vachaalam_SmallMOOCs are one of the strongest mediums to reach out to those who seek knowledge and education. During the span of 2 years of offering MOOCs, I have come across some amazing and inspiring anecdotes of how people learn. In this series, I will try to to discuss these anecdotes through the blog posts. I hope you like them and I also hope you participate by adding your stories to these and enrich this exchange.

Looking forward to your comments, participation, and anecdotes which you have come across!

If you have been a learner of my MOOC (or any MOOC for that matter), please write a comment about the way in which the MOOC has been an enabler for you!

#MOOCkarotiVachalam #SKANI101x

गुरुपुराण |४| माझे अनिमेशन गुरु

 

 

alexander_victor_sir.jpg

१९९५ मध्ये जेव्हा ॲनिमेशन शिकण्यासाठी मी हैदराबादला गेलो त्यावेळी तिथे आम्हाला ही कला शिकवण्यासाठी रशियन शिक्षक येणार आहेत असं सांगण्यात आलं होतं. ह्या गोष्टीची आम्हाला सर्वात जास्त उत्सुकता लागली होती, आणि तिथे गेल्यापासून हे शिक्षक आम्हाला कधी भेटतायेत असं झालं होतं!  मुलाखती दरम्यान त्यांचं ओझरतं दर्शन झालं होतं पण कॉलेजच्या पहिल्या दिवशी त्यांची खऱ्या अर्थाने ओळख करून देण्यात आली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या नजरेत भरली ती म्हणजे त्यांचा आधुनिक आणि आदबशीर पेहराव. ॲनिमेशन क्षेत्रात शिकण्यास जाण्याच्या कल्पनेनेच आमच्या वर्गातल्या अनेक जणांनी चित्रविचित्र प्रकारच्या टी-शर्ट आणि जीन्स घालायला सुरुवात केली होती, विविध प्रकारच्या केशरचना अंगावर टॅटू आणि बरेच काही! या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा शिक्षक म्हणून अलेक्झांडर आणि विक्टर सरांची आम्हाला ओळख करून देण्यात आली तेव्हा ते दोघे अगदी वेगळे दिसले! दोघांनीही स्वच्छ पांढरे शर्ट त्यावर लालचुटूक टाय आणि मंद रंगसंगतीचे कोट घातले होते. ह्या पेहरावात ते ॲनिमेटर असतील अशी आम्ही कल्पनाच केली नव्हती!

AlexabderSirसुरुवातीच्या ओळखीनंतर आम्ही जेव्हा वर्गात गेलो तेव्हा अलेक्झांडर सर त्यांच्या दुभाषा सह वर्गात दाखल झाले. ते अतिशय शांतपणे परंतु पुरेपूर हावभावासह बोलायचे. त्यांच्या दुभाष्याने त्यांची माहिती सांगायला सुरुवात केली यावरून हे कळलं की अलेक्झांडर डव्हीडव्ह हे मॉस्को येथील सोयूझ मल्टी फिल्म ह्या प्रसिद्ध ॲनिमेशन स्टुडिओचे ते ॲनिमेटर होते. वास्तविक अलेक्झांडर सर घरचे सधन होते परंतु रशियातल्या सैनिकी कार्याच्या सक्तीमुळे ते काही काळ सैन्यातही होते आणि अखेर ॲनिमेशनच्या आवडीमुळे त्यांनी अभ्यास आणि साधना करून ॲनिमेटर म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केलं होतं. बोलता बोलता त्यांनी त्यांचा कोट काढून खुर्चीला लावला आणि स्वच्छ पांढरा शर्ट च्या बाह्या मुडपून पेन्सील हातात घेतली.

त्यांनी पेन्सिल च्या जोरकस रेषांनी भाव दर्शवणारी चित्र काढायला सुरुवात केली त्यावरून त्यांच्यावर आमची अढळ श्रद्धा बसली. ॲनिमेशनच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये चित्रकलेचं महत्व, ते अतिशय समर्थपणे आम्हाला दाखवत असत. चित्रातील बारकावे सखोल निरीक्षणातून कसे येतात याचं त्यांनी आम्हाला अनेक वेळा सोदाहरण विषद केलं.

आमचा वर्ग त्याबाबतीत सुदैवी होता, कारण त्यांनी आम्हाला एक दिवस चक्क कॅमेरा घेऊन शेजारच्या मैदानावर निरीक्षणासाठी नेलं. आम्ही तिथे असलेल्या सर्व प्राणीमात्रांची चित्रं काढली आणि कॅमेऱ्यांनी त्यांच्या सगळ्या हालचाली टिपल्या. त्याच दिवशी, त्यांनी स्वतः धावपटूची एक नक्कल केली, ती पाहून आम्हांला हसून हसून दमायला झालं! परत येताना आमच्या लक्षात एक गोष्ट आली, की आज दिवसभर आम्ही सरांशी इतकावेळ बोललो, हसलो, पण दुभाषा नसताना! 

VictorSirअलेक्झांडर सरांच्या नेमके उलट आमचे विक्टर सर होते. अलेक्झांडर हे सरळ केस योग्य पद्धतीने भांग पाडून चापून चोपून बसवलेले दाढी मिशा सफाचट असे, तर त्याउलट व्हिक्टर सर मात्र सोनेरी पिंगट केसांची वेणी असलेले, आणि बुल्गानिन पद्धतीची दाढीमिशी असलेले! या त्यांच्या रुपामुळे आम्हाला त्यांची भीती वाटायची. 

व्हिक्टर अरसेनटिव्ह सरांचं बोलणं अतिशय जोरकस आणि ठाम असायचं त्यांच्या ओरडून करण्याच्या पद्धतीला त्यांचे दुभाषी तेवढीच तोलामोलाची साथ द्यायचे, आणि जोरकस इंग्रजी शब्द वापरून त्यांचा ‘भावार्थ’ आमच्या पर्यंत पोहोचवायचे. ते रागीट वाटत असली तरीही कलेच्या बाबतीत ते मृदू स्वभावाचे होते. चित्र काढताना टेबलाची व्यवस्था कशी असावी, तुमची तयारी कशी करावी, वस्तू कुठे असाव्यात ह्याबाबतीत त्यांचे नियम अतिशय कडक होते. वर्गात फेरी मारताना एखाद्या वेळी आपल्या टेबलाजवळ ते थांबले किंवा आपण त्यांना शंका विचारण्यासाठी बोलवलं तर बऱ्याचदा पहिली दहा मिनिटं आपलं अव्यवस्थित टेबल नीट करण्यात ते घालवत असत. एका बाजूनी तोंडाचा पट्टा सुरु असे आणि दुसऱ्या हाताने टेबल आवरणे सुरु असे.

सगळ्यात आधी ते पेन्सिलीची जागा बघत आणि एखादीच पेन्सिल दिसली तर ते पहिल्यांदा ओरडायचे! तुम्ही कलाकार आहात, तुमची तंद्री लागलेली असताना मध्ये पेन्सिलीचं टोक तुटलं तर तुमची तंद्री भंग पावते, म्हणून तीन ते चार पेन्सिली व्यवस्थित टोक काढून तयार असायला हव्यात. खोड-रबरचा छोटासा तुकडा इकडे तिकडे पडतो, आणि आयत्यावेळी हाताला लागत नाही म्हणून त्याला दोरा बांधून ते सहज हाताला लागेल अशी व्यवस्था करायला हवी. कागद योग्य कप्प्यांमध्ये हवेत त्यामुळे कोरा कागद नेमका हाताला लागेल. दिवा चालू पाहिजे आणि त्याचा अँगल आपल्यावर व्यवस्थित प्रकाश पडेल असाच हवा. खुर्चीची उंची व्यवस्थीतच हवी… इत्यादि गोष्टींकडे लक्ष ठेवावे त्यामुळे आपल्याला काम करताना कुठल्याही प्रकारचा शारीरिक थकवा जाणवणार नाही.

हे सगळं साग्रसंगीत मांडल्यावर मग ते चित्र काढायला सुरुवात करायचे. चित्र काढताना त्या चित्राबद्दलची माहिती सांगत असत. उदाहरणार्थ कोंबडी चालत असताना तिचा शेपटीचा भाग कसा वर होतो किंवा तिची चोच कशी वर करते, याचं उदाहरण ते त्यांचे बोटांचा आणि मानेचा वापर करून सातत्याने दाखवत असत. ॲनिमेटरच्या टेबलावरचा आरसा ते अतिशय खुबीने वापरत असत आणि हातांच्या वेगवेगळ्या आकृत्या करून त्याच्यामधून योग्य ते भाव निर्माण करून त्याचे चित्र काढत.

आमचा तीन वर्षाचा कालावधी संपल्यावर हे शिक्षक रशियाला परत जाताना आम्हाला अत्यंत वाईट वाटलं. या तीन वर्षाच्या काळातल्या प्रत्येक क्षणाला त्यांनी गुरूच्या नात्याने ज्ञानदान केले, आणि आयुष्यभर साथ देणारी ‘दृष्टी’ दिली!

Selected as 2019 edX Prize Finalist!

edX_PrizeExtremely delighted to share the news that the Fundamentals of 3D visualization program from IITBombayX has been selected as one of the 10 finalists for the edX Prize 2019! It is a result of the visionary leadership of Prof. DB Phatak, Prof. Sridhar Iyer, Prof. Sudarshan; and the support from the entire team at IITBombayX led by Dr. Kalpana Kannan. It was her team member: Urmila Deshmukh, who was the first one to suggest that I file my nomination! Thank you Urmila for that!

This program could not have been possible without the support from my co-instructors: Kaumudi Sahasrabudhe, Nitin Ayer, and Sneha Deorukhkar. The production and the post-production teams (Shekhar Ovhal), teaching assistants, and the discussion forum moderators have been crucial in creating this. My colleagues Heramb Sukhthankar, Nitin Ayer, Amit Shukla, Sandeep Gaikwad, and Md. Salman worked painstakingly, through the data of the 54000 learners to create an impressive nomination! Your hardwork has paid off boys!

This program, has more than 25000 learners registered (over the 4 offerings so far). Interestingly, the completion rate of these skill courses has been over 65%.

I have had the fortune of interacting with most vibrant participants who have made this journey memorable! Being in top 10 teachers itself is a great feeling! and I will be forever indebted to all those who have made this possible! We keep our fingers crossed and await the final result! Keep those wishes pouring in!

गुरुपुराण ।३। अजेय झणकर

अजेय सर आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांचं अस्तित्व मला अनेक वेळा जाणवत राहतं आणि म्हणून मी त्यांचा उल्लेख ते माझ्या बरोबर असल्या सारखाच करणार आहे.

AjeySirऔरंगाबादहून पुण्याला नोकरीच्या निमित्ताने आलो, आणि २-३ ठिकाणी प्रयत्न केला. सर्वात आधी सदाशिव पेठेत एका प्रकाशन संस्थेत मासिका साठी चित्रं काढू लागलो. पण तिथे खूपच कमी काम असल्यामुळे काही महिन्यात कंटाळलो . नंतर मी खडकी येथील एका जाहिरात संस्थेमध्ये काम करू लागलो. तिथे रूढार्थाने जाहिराती होत नसत. बरेचसे काम औद्योगिक प्रकारचे असे. विविध यंत्रांसाठी लागणारे स्टिकर्स, पत्रकं, आणि माहितीपुस्तिका बनवण्याचं काम असे.

मला सांगितल्याप्रमाणे मी मार्केट मिशनरीजच्या ऑफिस मध्ये वेळेवर जाऊन पोहोचलो अजेय सर थोडयाच वेळात भेटतील असं सांगून तिथले कर्मचारी लगबगीने आत बाहेर करत होते. बराच वेळ वाट पाहिल्यावर अखेर अजेय सर तिथे आले. मला पाहून एकदम त्याना साक्षात्कार झाला आणि ते म्हणाले,”अरे, तूच का तो आर्टिस्ट ज्याचा मी Interview घ्यायचाय? बरं झालं तू इथे बसला होतास नाहीतर मी पूर्णपणे विसरून घरी निघून गेलो असतो. माझं काम बघितल्यवर त्यानी फारशी प्रतिक्रिया दिली नाही. परंतु तुला कधी यायला जमेल हे मात्र विचारलं. मग  मला किती पगार मिळतो हे पण विचारलं. त्याकाळी मला तेराशे रुपये असा भरभक्कम पगार मिळत असे. ते ऐकून अजेय सर थोडे विचारात पडल्यासारखे वाटले. त्यावर मी त्यांना म्हटले,”सर मला जास्त पगाराची अपेक्षा नाही. मला काम करायचं आणि शिकायचं आहे.

थोडा वेळ विचार करून अजेय सर मला म्हणाले, ”मोठी पंचाईत आहे मी ठरवलं तरीही मला तुला अडीज हजार पेक्षा एक रुपया कमी पगारावरही ठेवता येणार नाही. अरे, आमच्या कंपनीचा नियमच आहे हा.” मी हुशः केलं आणि, या भरगोस पगारवाढीचा आनंद घेऊन मार्केट मिशनरीज मध्ये रुजू झालो.

अजेय सरांबरोबर काम करणं हा एक विलक्षण अनुभवच होता. या काळात आम्ही घडयाळ न वापरता केवळ कॅलेंडरच वापरावं अशी परिस्थिती होती. दिवस-रात्रयाचं भान आमच्या या टीमला कधीही नसे. आणि या सर्व काळात अजेयसर आमच्या बरोबर कायमच असत. हळूहळू याची सवयच झाली. संध्याकाळी कल्पनेवर काम सुरु करणे मग त्यावर अनेक चर्चा आणि अखेर जेवणानंतर त्यावर शिक्कामोर्तब मग रात्री तापकीर, अतुल (बाबा) किंवा बाब्या आमच्यासाठी कुठे जेवण मिळतंय कां याची चौकशी करणार. अजेयसर आणि आम्ही मुलं म्हणजे मीराजप्रकाश, आणि कधी कधी मामा (म्हणजे सुनील हंबीर) हे सगळे तिथे जाऊन पाव भाजी किंवा डेक्कनला  पिठलं भाकरी खाणार. ह्या सगळ्यात अजेय सर कधीही त्याचं ‘सर’पण आमच्यावर लादत नसत. हास्य-विनोद करत हे जेवण चालायचं. बहुतेक वेळा अतुल हा एक हक्काचं गिऱ्हाईक असायचा! अजेयसरांचं प्रेमही विलक्षण असायचं. मला आठवतंय, विजय सरांना तिखट आवडतं म्हणून त्यांच्या वाढदिवसाला ‘ठेचा पार्टी’ केली होती!

मला माझ्या पुढच्या शिक्षणासाठी हैदराबादला जावं लागणार होतं. तो निर्णय त्यांना सांगितल्यावर त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, आणि मला भरभरून आशीर्वाद दिले! त्यानंतरही आम्ही संपर्कात होतो, आणि काही वर्षांनी जेव्हा मी मुंबईत स्थायिक झाल्याचं त्यांना कळलं तेव्हा त्यांनी मला भेटायला बोलावलं. ‘लेकरू’ च्या प्रीमियर ला आवर्जून सपत्नीक येण्याबद्दल आमंत्रण दिलं! कौमुदी पण मार्केट मिशनरी ची एक मिशनरी आहे हे कळल्यावर त्यांना खूप आनंद झाला! 

परंतु, त्यांची सर्वात आवडती आठवण म्हणजे, त्यांच्या बरोबर केलेले प्रवास. त्यातल्यात्यात आम्ही एकत्र केलेला पुणे ते नांदेड हा प्रवास खरोखरच अविस्मरणीय होता! नांदेड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संभेलनात ‘सरकारनामा’ प्रकाशित होणार होती, आणि त्यासाठी आम्ही तिथे जायचं ठरवलं! खरं म्हणजे मी औरंगाबादचा, म्हणून मला बरोबर घेतलं होतं, परंतु मी औरंगाबाद च्या पुढे मराठवाडा पहिलाच नव्हता! माझं बिंग लवकरच उघडकीस आलं, कारण मला त्या रस्त्यातील गांवं कुठली, हे माझ्या गावीही नव्हतं! औरंगाबाद जवळ आलं होतं आणि जेवायची वेळ झाली होती. मी विचारलं, “सर, आपण घरीच जाऊ जेवायला”. त्यावर ते म्हणाले, “अरे, अचानक गेलो तर तुझ्या आई, आजीला त्रास होईल.. त्या पेक्षा आपण इथे धाब्यावर खाऊन घेऊ, आणि मग चहा प्यायला तुझ्या घरी जाऊ! तापकीर, बघ एखादा धाबा आहे का, आणि गाडी थांबव!”. आम्ही तिथे जेऊन मग घरी गेलो. अजेय सर माझ्या घरी सगळ्यांना भेटले. त्यांना ‘साहेब’ म्हणवून घेताना खूपच अवघडल्यागत झालेलं पाहिलं! माझ्या बाबांना ‘सरकारनामा’ची प्रत देऊन, आम्ही नांदेड ला गेलो. साहित्य संभेलनात मला ते वारकऱ्या सारखे दिसले! इथल्या सारस्वतांच्या मांदियाळीत ते presentations, campaigns, budgets, आणि deadlines ला काहीही स्थान नव्हतं!

एरव्ही ‘धर्म-प्रसारक’ ह्या जमातीद्वारे केल्या जाणाऱ्या धार्मिक रूपांतरणाविषयी माझ्या मनात खूप अढी आहे, परंतु, अजेय झणकर ह्या अवलिया ‘मिशनरी’ने मात्र तुम्ही करत असलेल्या कामातून ‘आनंद’ कसा घ्यायचा ह्याची ‘दीक्षा’ आणि ‘संथा’ मला आणि त्याच्या बरोबरच्या प्रत्येकाला अगदी सप्रयोग दिली! अनेक वर्ष (१७ पूर्ण झाली ह्या महिन्यात) सरकारी नोकरीत राहूनहि मला काम करताना द र रो ज ‘मज्जा’ येते, किंवा मी अजून ‘सरकारी बाबू’ का नाही झालो ह्याचं रहस्य अजेय सरांबरोबर ‘जगलेल्या’ काळात दडलेलं आहे!

 

 

Unusual ride with The Cabwaala

I landed at the Mumbai Airport, and was waiting for the baggage. It was the end of a longish trip where I had a bag to be collected. It was quite late in the night (12:30 AM) and I was exhausted! The moment I got the bag, I was on the way out and getting a cab as I was walking. The cab got confirmed and I reached the pickup point. It was a huge mess there, with multiple cars honking and delaying everyone in the process!

In all this, I get a call from the taxi driver, who assures me to be there in next two minutes. I see the number plate and literally jump in to the car! I have the countdown started in my mind to calculate when I am getting to hit the bed after this long and tiring day! The driver Mehboob is exactly the opposite, and bubbling with enthusiasm at this late hour. He is talking to me and I am able to respond barely with just Hmmm/Achha/Sahi hai responses (remember Zakir khan??) in a random manner!

I am intrigued with one sentence he says, “Sir, I like talking to my passengers, and I request them for an interview. I run a YouTube channel by the name ‘The Cabwala‘, where I upload these interview (off course with their permission). These interviews would be about their career progression, and some tips for the viewers in case they want to pursue it”. I was quite surprised by this and had more questions for him..like how do the passengers have time for this?, where and how does he record it?, and how does he produce the final version? He had answers for all. He told me, “I record during the journey..so there is no separate time commitment required. I just request them to move to the front seat. I have this small iPhone which is my primary camera, and a microphone attached to it. I edit using iMovie and upload!!! I have started recently, but the response from both the passengers as well as the subscribers is encouraging! Looking forward for some interesting experience”.

cabwaala.png

I was quite happy to listen to this venture, when he asked me about my profession. The moment he came to know about my animation course online, he simply pulled of the car to the roadside and asked me if he can interview me? Just as an excuse, I said, ” Ya, we could have…but it is night time, and the shoot will be all dark. Otherwise I had no issues!”. he just put his handbrake and said, “Sir, aap uski fikar mat kijiye…sab setup hai..bus aap aage aajaiye” (Don’t worry Sir, I have the required setup. Just come over to the front seat).

I obliged, and came to the front seat, and saw him connected a cable to the USB port  near his dashboard, and we had two bright LED bulbs illuminating the car from inside! He then quickly decided the script, pressed the record button on the iPhone, and we were ON! See the interview here:

It was a nice experience and I found many interesting aspects to ponder upon. I loved to multitask with the car driving and not letting go his passion of making videos and acquaintances both! He has managed to design the technology components to suit his requirements. After reading the feedback for the videos that he has uploaded, I also realised the social impact of his work, where he empowers the viewers to know about the profession in this short interview, and directly from the working professional. It is important to note here that these passengers which he is interviewing may/may not be influential speakers/career counselors, however they are able to connect well with the viewers because of the interview format Mehboob uses!

Kudos to you Mehboob Shiledar, ‘The Cabwala‘. May you continue to share more such stories and touch the lives of many!

गुरुपुराण ।२। श्रीमती कुमुद सप्रे

माझ्या आयुष्यातल्या तसंच शालेय जीवनातल्याही पहिल्या गुरु म्हणजे श्रीमती कुमुद सप्रे. त्याकाळी आमच्या शेजारी Blue Buds नावाची एक मॉंन्टेसरी होती. परंतु तिथे पुढच्या शिक्षणाची सोय चांगली नसल्याने म्हणा, किंवा त्याहूनही अधिक जवळ शाळा झाल्यामुळे म्हणा माझी रवानगी अल्फा आयडियल स्कूल या शाळेमध्ये झाली.

ही शाळा आमच्या घराच्या खूप जवळ म्हणजे केवळ रस्ता ओलांडण्याच्या अंतरावर होती. पाच पावलात शाळा गाठणं हा स्वर्गीय आनंद त्यामुळे मी चार वर्ष उपभोगला. ह्या नवीन सुरु झालेल्या शाळेच्या शिक्षिका, कम मुख्याध्यापिका होत्या कुमुद सप्रे. यांना आम्ही आंटी असं म्हणायचो (आता इतक्या वर्षानंतर आम्ही आमच्या शिक्षिकेला आंटी का म्हणायचो हे काही समजत नाही). सप्रे आंटी पूर्वी भोसला मिलिटरी स्कूलच्या शिक्षिका वा पर्यविशिक्षिका होत्या अशी माहिती आम्हाला कळली होती. भोसला मिलिटरी स्कूल आणि तेथील शिस्त ह्या गोष्टी पहिलीच्या वर्गात जरी कळल्या नसल्या तरी त्यांची शिस्त अनुभवल्यावर भोसला मिलिटरी स्कूल म्हणजे काय हे कळायला फारसा वेळ लागला नाही.

आमच्या वर्गात इन-मीन आठ विद्यार्थी होते. त्यात सहा मुलं आणि दोन मुली. आंटी आम्हाला इंग्लिश आणि (बहुदा) गणित शिकवायच्या आणि काही इतर टीचर्स उरलेले विषय. आमच्या घराच्या समोर असलेल्या श्री. विटेकर यांच्या घरात ही शाळा सुरु झाली होती. त्याच घराच्या दुसऱ्या मजल्यावरील दोन खोल्यांच्या जागेत आंटी राहायच्या. त्या एकट्याच राहत असल्यामुळे अनेकदा शाळा संपल्यानंतर आमच्या घरी येत असत. त्यावेळी त्या शिक्षिका किंवा मुख्याधिपिका नसत, परंतु मला मात्र त्यांची भेट जाचक वाटत असे. मला बऱ्याचदा हा प्रश्न पडायचा, की शाळेत एवढ्या तास त्या भेटल्यानंतर पुन्हा घरी त्यांचं दर्शन कशासाठी?

एकदा काही कारणांनी त्या दोन – तीन दिवस आमच्या घरी येऊ शकल्या नव्हत्या. शाळेतल्या वर्गात त्यांनी मला विचारल्यावर मी माझा गृहपाठ पूर्ण न झाल्याचं त्यांना कळलं. मला त्यांनी त्याचं कारण विचारल्यावर माझ्या आयुष्यातली पहिली थाप मी तिथे मारली. ‘आंटी, काल आमच्या घरी पाहुणे आले होते. त्यावेळी मला घरी खूप काम असल्यामुळे मी गृहपाठ करू शकलो नाही.’ आंटीनी फारशी प्रतिक्रिया न देता वर्ग संपवला.  मात्र शाळा संपल्यानंतर संध्याकाळी आमच्या घरी आल्या. त्यांची आणि आजीची भेट चालू असलेली बघून मला फार विशेष वाटले नाही. परंतु नंतर अचानक जेव्हा आजीची जोरदार हाक ऐकू आली त्यावेळी मला काहीतरी बिनसल्याचं जाणवलं. मी पळत आजी आणि आंटीसमोर उभा राहिल्यावर आजीने मला जवळजवळ दरडावणीच्या स्वरात विचारलं, ‘काय रे, आम्ही तुला काल काय कामं दिली होती ज्यामुळे तु गृहपाठ पूर्ण केला नाहीस?’. मी उत्तरलो, ‘अगं आजी, ते नाही का, काल…. दादांच्या ऑफीसचे साहेब आले होते…. संध्याकाळी….. तेव्हा… ‘. आजीनी विचारलं, ‘हो, पण तु काय काम केलंस?’ ‘अगं, त्यांना दिलेल्या चहाचा कप नाही का मी आत नेऊन ठेवला?’. ह्या उत्तरावर दोघी खो-खो हसायला लागल्या, आणि माझी फजिती माझ्या लक्षात आली! नंतर मी थापा मारल्या पण त्यातील बहुतेक ‘थापा’ तबल्यावर होत्या!

आंटी एकट्याच असल्या तरीही शिस्तबद्ध राहायच्या! त्या कायम पांढऱ्या रंगाच्या आणि मंद रंगसंगतीच्या साड्या नेसायच्या, पण त्या अतिशय स्वच्छ आणि परीटघडीच्या असायच्या. हातावर असलेलं घड्याळ त्यांच्याकडे डायल राहील अश्या प्रकारे बांधलेलं असायचं, आणि त्या वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर होत्या. त्याचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं, आणि त्याचं अक्षरही खूप छान होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या उत्तम व्यवस्थापकही होत्या! माझ्या इंग्रजीचा आणि सुलेखनाचा पाया त्यांनीच रचला असे म्हणता येईल. आम्ही ती शाळा सोडून सरस्वती भुवन हायस्कूल ह्या शाळेत दाखल झालो. तिथे आम्हाला Lower English असल्यामुळे आधीच्या इंग्रजीचा खूपच फायदा झाला. काही वर्षांपूर्वी, मी त्यांना भेटलो. त्या वयोमानामुळे थकल्या होत्या. पलंगावर पडून होत्या. त्यांना मी भेटायला आल्याचं अप्रूप वाटलं.

आज आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा शोधनिबंध स्वीकारला गेल्यावर, महत्वाच्या समितीमध्ये निमंत्रित केल्यावर, व्याख्यानाला बोलावल्यावर, त्यानंतर लोकांनी केलेलं कौतुक ऐकल्यावर, प्रत्येक वेळी:

ती २ शिक्षिकांची, ४ खोल्यांची, ५ पावलांवरची, ८ वर्गमित्रांची, नावाप्रमाणे ALPHA असलेल्या माझ्या शाळेची आणि पर्यायाने त्या शाळेच्या सर्वेसर्वा: श्रीमती कुमुद सप्रे यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही!

 

 

 

गुरु पुराण

माझ्या आजीच्या लेखमाले बद्दल तुमचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्या मुळे प्रेरित होऊन एक नवा संकल्प!

आज गुरु पौर्णिमा, आणि ५ सप्टेंबर ला येणारा शिक्षक दिन. या दोन महत्वाच्या दिवसाचं औचित्य साधून हा एक नेम. ह्या दोन तारखांच्या काळात आयुष्यात भेटलेल्या विविध गुरु आणि शिक्षकांविषयी दर २-३ दिवसां आड  एक लेख मराठीत लिहायचा. मध्ये बरेच दिवस असल्याने खूप लिहिता येईल. सुदैवाने बरेच गुरु असल्यामुळे विषयांना तोटा नाही.

लेख वाचून तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा.